पाचगणीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या! उमदेवारांची अंतर्गत प्रचार मोहीम मात्र चालू..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषद सार्वत्रिक  निवडणुकीची  गेले  चार दिवसांपासून  सुरू असणारी रणधुमाळी  प्रचाराच्या तोफा अखेर आज थंडावल्या. तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने अंतर्गत प्रचार मोहीम तेज होणार.

पाचगणी नगरपरिषदेच्या उमेदवारांची निवडणूक तयारी पूर्ण झाली असून आज रात्री १० वाजता प्रचार बंद होणार होती. मात्र त्याअगोदरच आज दुपारपासूनच उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा थांबिल्याचे दिसले. पदयात्रा, घरदारी भेटी, फ्लॅक्स-बॅनरची जोरदार स्पर्धा आणि सोशल मीडियावरील डिजिटल रणधुमाळी यानंतर आज शहरात शांतता पसरली.

मतदारांना विनयपूर्वक आवाहन करण्यात तर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणी मतदार याद्या तपासून व्यवस्था पक्की केली. सर्वच प्रभागांत वातावरण निवांत झाल्याने मतदारांचे लक्ष आता मतदानाच्या उद्या होणाऱ्या  मतदान प्रक्रियेकडे लागले आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलिसांनी देखील शहरात गस्त वाढवली असून प्रशासनानेही सर्व तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.

आता पाचगणीकरांच्या बोटावर शाई लागणार… आणि निकाल ठरवणार पुढील विकासाची दिशा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!