काटवली घाटात मुंबईच्या पर्यटकांची कार गटारात; सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love

गिरीस्थान  टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी–काटवली रस्त्यावरील काटवली घाटातील एका धोकादायक वळणावर मुंबईहून आलेल्या पर्यटकांच्या होंडा सिटी (क्रमांक एम.एच. ०२ डी.जे. २९८६) या कारचा अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने ही कार डोंगर बाजूच्या गटारात घसरली. ही घटना दुपारी ३:१५ च्या दरम्यान घडली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

सध्या पाचगणी या पर्यटनस्थळी येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या गाड्या गुगल मॅपच्या मार्गदर्शनानुसार पाचवड–पाचगणी मार्गाचा अवलंब करून येत आहेत. हा रस्ता अरुंद व वळणावळणाचा असल्याने येथे वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक पर्यटकांची वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे.

 या या घटनेत मुंबईहून आलेल्या पर्यटकांची कार होंडा सिटी (क्रमांक एम.एच. ०२ डी.जे. २९८६) या पर्यटकाला  दुपारी ३:१५ च्या सुमारास वळणाचा अंदाज न आल्याने वाहन थेट गटारात घसरले. सुदैवाने ही गाडी दरीच्या बाजूला न जाता डोंगराच्या बाजूला धडकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि प्रवासी बचावले. काही क्षणांचा फरक आणि थोडीशी चूक मोठ्या अपघातात रूपांतर होऊ शकली असती, अशी चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती.

 

या घटनेमुळे घाट रस्त्यांवर वेगावर नियंत्रण ठेवणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अरुंद व वळणावळणाच्या रस्त्यांवर वाहन चालवताना नियमांचे पालन न केल्यास अशा घटना वारंवार घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाने तसेच पर्यटकांनीही याबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!