“निष्ठेची मशाल हाती घेऊन मिलिंद नलावडे रिंगणात; म्हसवे गटात ठाकरे सेनेचा विजयाचा निर्धार” “आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा”
“आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या म्हसवे गटाची निवडणूक यावेळी केवळ राजकीय स्पर्धा न राहता, निष्ठा, विश्वास आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची लढाई बनली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी, खर्शी गण आणि म्हसवे गटात सामान्य जनतेशी थेट नाळ जोडलेले, सुख-दुःखात धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नलावडे हे लोकआग्रहातून आणि लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

त्यांच्या उमेदवारीमागे कुठलीही सत्ता नाही, कुठलाही अहंकार नाही, तर आहे तो सामान्य माणसाचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा. त्यामुळेच आज संपूर्ण म्हसवे गटात त्यांच्या समर्थनार्थ एक सकारात्मक आणि आशेची लाट पसरली आहे. खर्शी–बारामुरे गणात ठाकरे सेनेची मोठी ताकद असून, यावेळी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते “आता नाही तर कधीच नाही” या भावनेतून अक्षरशः पेटून उठले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेले हे कार्यकर्ते, मिलिंद नलावडे यांना विजयी करण्यासाठी गावोगावी फिरून, घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांचा हक्काचा मतदारांचा गट या निवडणुकीत निर्णायक ठरेल, हे स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे विरोधकही या निष्ठावंत ताकदीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
आज ही निवडणूक केवळ विजय-पराजयाची नसून, ती निष्ठेच्या, स्वाभिमानाच्या आणि सामान्य माणसाच्या सन्मानाची लढाई बनली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आपला हक्काचा माणूस म्हणून मिलिंद नलावडे यांना रिंगणात उतरवले असून, त्यांच्या पाठीशी उभे असलेले कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. त्यामुळे म्हसवे गटात मिलिंद नलावडे यांचा विजय निश्चित असल्याची भावना दिवसेंदिवस अधिक बळावत चालली आहे.

