दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पाचगणी-महाबळेश्वरात वावर.?; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन  

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध सुरू असून, सदर आरोपी पाचगणी-महाबळेश्वर परिसरात वास्तव्य करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनस्थळी काम करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्धापुर पोलीस स्टेशन, उपविभाग नांदेड ग्रामीण येथे गुन्हा नोंद क्रमांक ४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्राथमिक तपासानुसार आरोपीने दोन खून केल्याचा संशय असून, तो हॉटेलमध्ये वेटर व कुक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील हॉटेल, लॉज, ढाबे तसेच खानावळी परिसरात पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अर्धापुर तालुक्यातील जांभरून शिवार परिसरात एका ७० वर्षीय महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता.

  1. डोक्यावर व तोंडावर मोठ्या दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याची तक्रार फिर्यादींकडून देण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या छायाचित्रातील इसम हा या गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, सडपातळ बांधा, सावळा रंग, उंची अंदाजे १६५ ते १६८ सेंटीमीटर असून चेहऱ्यावर मिशी आहे. पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनी, हॉटेल चालकांनी तसेच पर्यटक सेवा व्यवसायिकांनी संबंधित आरोपी आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक : पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर कदम – 7083552233 पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरेश भोसले – 7972333092 नियंत्रण कक्ष, नांदेड – 02462-234720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!