पाचगणीचा कारभारी आज ठरणार तर ; प्रभाग आरक्षण ८ ऑक्टोबर बुधवारी..!
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक प्रक्रियांनी वेग घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपरिषदेच्या प्रभाग रचना अंतिम होऊन आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पालिका सभागृहात निघणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी दिली आहे..

पाचगणी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून आज नगराध्यक्ष आरक्षण सोडत मुंबई येथे होणार आहे. तर पांचगणी नगरपरिषदेच्या सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्याकरिता सोडत काढणेसाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे
आरक्षण सोडत दिनांक बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर, २५ वेळ सकाळी ११.०० वाजता ठिकाण नगरपरिषद सभागृह, आरक्षण प्रसिद्ध गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५, हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी करिता गुरुवार, दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ ते मंगळवार, १४ ऑक्टोबर २५ दुपारी ३.०० वा. पर्यंत आहे.

