🔶 “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके” 🔶 “लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके” 🔶 “विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व” 🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸
🔶 “बोलण्यात नव्हे, कृतीतून घडणारा विकास – शाहूनगरचा युवा आयडॉल महेश दादा खांडके”
🔶
“लोकांचा माणूस, विकासाचा ध्यास – नगरसेवक महेश दादा खांडके”
🔶
“विश्वास, सेवा आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व”
🌸 शब्दभाव…!! महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने 🌸

बोलणं नव्हे तर कृतीतून करून दाखवणं हाच ज्याचा स्थायी स्वभाव, असा हा युवा आयडॉल – महेश दादा खांडके. शाहूनगरचा सर्वांगीण विकास हाच ज्याचा जीवनमंत्र आहे. युवकांच्या मनात आदराचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं अढळ स्थान निर्माण करणारा हा नेता आज नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासाचं समर्थ, संवेदनशील आणि प्रामाणिक नेतृत्व करीत आहे.
महेश दादांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले आणि आज बांधकाम व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करणारे आशुतोष व ओंकार मोतलिंग हे युवा बंधू, आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरलेल्या, बंधुतुल्य महेश दादांना वाढदिवसानिमित्त शब्दसुमनांनी गौरवित करीत आहेत…

म – मेहनती युवक, जो प्रत्येक काम मनापासून पूर्ण करतो…
हे – हेतुपूर्वक, दूरदृष्टीने आणि जबाबदारीने निर्णय घेणारा…
श – शिस्तप्रिय स्वभाव, जो नकळत सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करतो…!
पाचगणी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून उच्चशिक्षित महेश अनिल खांडके यांनी दणदणीत विजय मिळवत प्रथमच नगरसेवक म्हणून नगरपालिकेत पाऊल ठेवलं. शांत, मितभाषी, मोजक्या शब्दांत पण ठाम भूमिका मांडणारा हा नेता मित्रपरिवारात सदैव हसतमुख आणि सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी कायम तत्पर असतो. सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणं हाच त्यांच्या नेतृत्वाचा खरा पाया आहे.

महेश दादा हे केवळ समस्या मांडणारे नाहीत, तर त्या मुळापासून सोडवण्यासाठी झटणारे नेतृत्व आहेत. शाहूनगरमधील प्रत्येक घरातील सुख-दुःखात सहभागी होणारा हा आपला माणूस असल्यामुळेच आज युवकांच्या नजरा आशेने महेश दादांकडे वळल्या आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी केवळ पद स्वीकारलेलं नाही, तर विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे.
खांडके कुटुंब समाजकार्यात अग्रेसर असलेलं, मात्र प्रसिद्धीपासून कायम दूर राहिलेलं कुटुंब आहे. महेश दादांच्या मातोश्री विजया खांडके (ताई) या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून, रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी कायम जिव्हाळ्याचा संबंध राहिला. सेवा, संवेदना आणि माणुसकी हे संस्कार महेश दादांच्या मनावर लहानपणापासूनच खोलवर बिंबले.
फार्मसीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या चौकटीत न अडकता त्यांनी शेतीचा मार्ग निवडला. काही काळ स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला, त्यानंतर वडिलोपार्जित पाणी टँकर व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेला. पुढे पत्नी सौ. निशिता खांडके यांच्या साथीने भिलार येथे “एंजल विंग्ज” ही शाळा सुरू करून शिक्षण क्षेत्रातही समाजासाठी आपलं योगदान दिलं.
महेश दादांनी अनेकांना मदतीचा हात देत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं. देण्यात समाधान मानणं हीच त्यांच्या सामाजिक जीवनाची खरी ओळख आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी संघर्षाची वाट निवडली. पहिल्या पराभवातून धडा घेत, २०२५ साली घरच्या अंगणात — शाहूनगर प्रभागात — मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं.
जनतेच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला आणि आज ते शाहूनगरच्या विकासाचे शिल्पकार म्हणून नवा इतिहास घडवताना दिसत आहेत.
अशा या शांत, संयमी, कर्तृत्ववान आणि लोकांच्या हृदयात घर केलेल्या नेतृत्वाला —
युवा आयडॉल, विकासाचं स्वप्न जगणारे महेश दादा खांडके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचं नेतृत्व शाहूनगरसह संपूर्ण पाचगणीसाठी नवी दिशा देणारं, नवी उमेद देणारं ठरो, हीच सदिच्छा!
शब्दांकन : आशुतोष व ओंकार मोतलिंग (सिव्हिल इंजिनिअर)
(मोतलिंगज बिल्डिंग डेव्हलपर अँड कन्स्ट्रक्शन)
लेखन : दिलीप पाडळे (पाचगणी)

