सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …
गिरीस्थान टाईम्स वृत्तसातारा : (अजित जगताप ) ग्रामीण भागातील ग्रामपंचायत म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. असं त्याचे स्वरूप होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले असल्याने चेहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतनेस्वतःचे उपहारगृह निर्माण करून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातारा जिल्हा भाजप नेते व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील कावडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खऱ्या अर्थाने गावासाठी ग्रामस्थांनी जीव ओतला आहे. एवढेच नव्हे तर भारतातील पहिले उपहारगृह असलेले ग्रामपंचायत अशी विक्रमी नोंद करण्यास भाग पाडले आहे. ही सामुदायिक यशाची गुरुकिल्ली आहे.
कावडी गावचे सरपंच यशवंत मानकुमरे ,उपसरपंच शशिकांत मानकुमरे ,महिला सदस्य सौ मंगल लक्ष्मण.मानकुमरे, शंकर मानकुमरे, रंजना मानकुमरे, प्रफुल सकपाळ, कुमारी कार्तिकी कदम, महेश मानकुमरे त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे, ग्रामपंचायत कार्यालय सेवक वैभव याचबरोबर सर्व ग्रामस्थांचाही सहभाग आहे.
जावळी तालुक्यातील बहुचर्चित महू हातगेघर धरणामुळे विस्थापित झालेल्या कावडीकरांनी खऱ्या अर्थाने एक गाव.. एकजूट दाखवून दिली आहे. या अभिनव उपक्रमाचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्याचा आदर्श घेऊन महू ,विवर, पानस, घोटेकर, पिंपळी, गणेश पेठ, वहागाव, खर्शी बारामुरे , रांजणी, रुईकर, हातगेघर मुरा, करहर, काटवली सनपाने गावातील ग्रामस्थ या गावाला भेटी देत आहेत. आपल्या गावातील समृद्धी गाव हे स्वप्न असेच पूर्ण व्हावे यासाठी बांधणी करत आहेत.
कावडी गावात अभियानासाठी ग्रामपंचायत प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि डिजिटल झाले आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून कर वसुली शंभर टक्के झाली आहे.,
स्वच्छ व हरित कावडी गाव तसेच सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत आहे.घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, आणि वृक्षारोपण
आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमी आणि क्रीडांगण यांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी यश मिळाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभगातून झालेले आहे . खऱ्या अर्थाने शासकीय योजनेची कावड ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन कावडी गावचा नावलौकिक केलेला आहे. या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संदीप परामणे, बापूसाहेब मानकुमरे यांनी सांगितले.
_______________________________

