पाचगणीमध्ये महामानवाला विनम्र अभिवादन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर अनुयायांची गर्दी..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाज परिवर्तनाचे दैवत आणि मानवतावादी मूल्यांचे प्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर स्मृतिदिनानिमित्त पाचगणीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे आज स्मारकास पुष्पहार अर्पण करून अनेक अनुयायींनी अभिवादन केले

दरवर्षीप्रमाणे शहरातील सामाजिक संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला विनम्र अभिवादन केले. यामध्ये पाचगणी नगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, माजी उपनराध्यक्ष संतोष कांबळे, माजी नगरसेवक प्रवीण बोधे, दिलीप भाऊ बगाडे, दीपक काळे, सुनील बगाडे, विजय वन्ने, यांच्या अनेक भीम अनुयायींनी महामानवाला अभिवादन केलं..
पाचगणीकरांनी सामूहिक सहभागातून आज दिवसभर महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्मृतिदिनाचे औचित्य जपले.
दुसऱ्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीमध्ये बौद्ध विहारात गौतम बुद्धांना अभिवादन केले यामध्ये माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, अमर बिरामणे, यांचसहित असंख्य नागरिकांनी महामानवाला अभिवादन केले.

