श्रीकृष्ण ज्वेलर्सकडून निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खास ऑफर; २ ते १५ डिसेंबरदरम्यान मजुरीवर ५०% सवलत व GST माफी  

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध  श्रीकृष्ण ज्वेलर्सने आपल्या असंख्य ग्राहकांसाठी खास  ऑफरची आणली आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून बोटाची शाई दाखवणाऱ्या ग्राहकांना मजुरीवर तब्बल ५० टक्के फ्लॅट सवलत व GST माफ करणार असल्याची माहिती श्रीकृष्णचे मालक तेजस ओझरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तेजस ओझरकर यांनी सांगितले की, “पालिका निवडणुका हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. या काळात नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाचा आणि जबाबदार सहभागाचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. त्या भावनेतून आमच्या ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, ही योजना २ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. या काळात ग्राहकांनी मतदानाची शाई दाखवून दुकानात भेट दिल्यास सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मजुरीत मोठी सवलत मिळू शकणार आहे.

श्रीकृष्ण ज्वेलर्स हे शहरातील एक प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड असून अनेक वर्षांपासून ते विविध सण-उत्सव, हंगामी सेल आणि ग्राहकाभिमुख योजना राबवत आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात जाहीर करण्यात आलेली ही योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यावसायिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!