डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील सांस्कृतिक भवनाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन ; प्रभाग क्रमांक दोन मधील विकास कामाने शुभारंभ..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते, मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास नगरसेवक शेखर कासुर्डे, नरेंद्र बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेंद्र पारठे, अमित कांबळे, आकाश बगाडे, परवीन मेमन, विमल भिलारे, राजश्री सणस, स्वाती कांबळे, अमृता गोळे, शिल्पा माने, माधुरी कासुर्डे, सुप्रिया माने, ऍस्टनचे संचालक अमर बिरामणे, उद्योगजक महेश माने, प्रशांत मोरे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नारायणशेठ बिरामणे व सुप्रिया माने यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आपल्या प्रभागातूनच पहिल्या विकासकामाचा शुभारंभ केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील नागरिक व पंचशील युवक मंडळ यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकाश मोरे (गुरुजी) यांनी नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचे अभिनंदन करत प्रभागातील रखडलेल्या कामांची माहिती दिली. येत्या काळात ही कामे मार्गी लावून परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी नितीन कांबळे, संचालक संपत खरात, माजी उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे, हौसाताई गायकवाड, रंजना घाडगे, सुनीलभाऊ भोसले, कुमार कांबळे, संदीप गायकवाड, सिद्धार्थ घाडगे, सुरज कांबळे, किशोर मस्के, शब्देश मोरे, मोहिनी गायकवाड, कमलताई शिंदे, सागर बोलके, विकास बिरामणे राकेश मोरे, आदी उपस्थित होते.
या सुशोभिकरण कामामुळे सांस्कृतिक भवनाचे रूपडे खुलून येणार असून येथील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना अधिक चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची उत्कृष्ट प्रशंसा करत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले व समाजप्रबोधनातील पत्रकारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

