प्रभाग २ मध्ये दबंग नेतृत्व नरेंद्र बिरामणे व सुप्रिया माने ; प्रचारात आघाडीवर नागरिकांचा वाढता प्रतिसाद..
गिरीरस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी पाचगणी नगरपरिषद निवडणूक रंगतदार होत असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांचे दबंग नेतृत्व विशेष ठळकपणे दिसून येत आहे. घराघरांत संपर्क, मुद्देसूद विकास आराखडा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची भक्कम साथ यामुळे बिरामणे व सुप्रिया माने यांचा प्रचार सध्या आघाडीवर असल्याची चर्चेला जोरदार उधाण आले आहे.

नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा, रस्ते सुविधा, स्वच्छता, पर्यटकांसाठी सुधारित योजनेसह विविध विकासकामांची हमी देत बिरामणे यांनी प्रचाराला गती दिली आहे. तरुण मतदारांमध्येही त्यांच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग २ मध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या या जनसमर्थनामुळे आगामी निवडणुकीत नरेंद्र बिरामणे आणि सुप्रिया माने हे मजबूत दावेदार ठरणार, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा जोरात आहे..
आहे.

