मतदारांची साथ हाच विश्वास सार्थ; प्रभागातील नागरिकांशी वचनबध्द; महेश खांडके

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मतदारांची साथ हाच विश्वास सार्थ ; प्रभागातील नागरिकांशी वचनबध्द;   “प्रभागातील सर्वांगीण विकासाकरिता मी पूर्णपणे वचनबद्ध आहे” असे स्पष्ट, ठाम विश्वास प्रभाग १० चे उमदेवार महेश दादा खांडके. यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केला..

पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला कालावधी अपुरा असल्याने प्रत्यक्ष घरभेटींवर खांडके यांनी जोर दिला असून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची ठाम भूमिका खांडके यांनी व्यक्त केली आहे.

“आपली चालण्याची काठी विकासाची, लिहू कोरी पाटी” या घोषवाक्यासह त्यांनी स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कामकाज आणि नागरी सुविधांचा विस्तार करण्याचे वचन दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात नव्या योजनांद्वारे प्रभागाला प्रगत दिशेने नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील वाढत्या गाठीभेटी यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खांडके यांना मिळत आहे.

आरोग्यसुविधांचे जाळे – या सर्व प्रश्नांकडे वेध देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी व्यक्तिगत भेट घेऊन त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “विकासाची गती वाढवण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसहभाग यांची सांगड घालणार,” असेही खांडके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!