“ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” — प्रभागात क्रमांक १० मध्ये नामदेव आप्पांना प्रचार धडाक्यात..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : प्रभागा क्रमांक १० चे उमेदवार नामदेव चोपडे (आप्पा) यांनी “ध्यास परिवर्तनाचा, संकल्प विकासाचा” या घोषवाक्याद्वारे परिवर्तनाची नांदी हाती घेतली असून त्यांना साथ परिवाराची लाभत असून
विकासप्रेरित प्रचार प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे
नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते नव्या विकास आराखड्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत नामदेव आप्पांनी पारदर्शक प्रशासन आणि गतीमान प्रगतीची हमी दिली आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, या क्षेत्रात बदल घडवण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांनीही उमेदवारांच्या या घोषणेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. तर संपूर्ण प्रचार यंत्रणेत त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव डॉ आशिष सुनबाई डॉ. शीतल यांची रणनीती उजवी ठरत आहे. आप्पांना देऊ साथ विकासाची पेटवू वात..
प्रभाग १० ची विकासाची दिशा सुनिश्चित करण्याकरिता, मतदारांनी नामदेव आप्पांना द्यावी साथ…!!

