पाचगणी निवडणूक विशेष: मतदारांच्या हाती विकासाची मशाल! ‘मेमन-कासुर्डे’ जोडीचा विजय निश्चित, विकासासाठी कटीबद्ध! ‘मतदारच आमचे बळ’: गिरीस्थानावरील परिवर्तनाची नांदी!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : गिरीस्थानावरील आगामी नगरपरिषद निवडणूक आता उमेदवारांच्या नव्हे, तर मतदारांच्याच हाती आहे, असा विश्वास प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार, माजी नगराध्यक्षा परवीन मेमन यांनी व्यक्त केला आहे. “आमचा विजय हा पक्का आहे!” या आत्मविश्वासामागे कोणतेही राजकीय आकडेमोड नसून, मतदारांनी दाखवलेला अभूतपूर्व विश्वास आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांना त्यांच्या विरोधात उमेदवारही मिळू शकला नाही, हीच त्यांच्या विजयाची पहिली आणि स्पष्ट चाहूल होती, असे मत मेमन यांनी आज प्रचारफेरीदरम्यान व्यक्त केले.

”आम्ही मतदारांच्या विश्वासाला पात्र राहू आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणार!” – परवीन मेमन, माजी नगराध्यक्षा व उमेदवार, प्रभाग ४.
आज माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे आणि परवीन मेमन यांनी प्रभागात जोरदार प्रचारफेरी काढली. यावेळी त्यांनी व्यापारी वर्गाशी संवाद साधून मतदानासाठी भावनिक साद घातली.
🤝 ना. मकरंद आबांच्या स्वप्नपूर्तीसाठी संधी हवी!
यावेळी बोलताना उमेदवार शेखर कासुर्डे यांनी पाचगणीच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला. “ना. मकरंद आबा पाटील यांनी पाचगणीच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. यासाठी आम्हाला फक्त एका संधीची गरज आहे!” कासुर्डे यांनी मतदारांना आवाहन केले, “मिळालेल्या संधीचे सोनं करून, शहराला खऱ्या अर्थाने ज्या विकासाची गरज आहे, तो विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
दोघांनाही प्रभागातून अभूतपूर्व आणि भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज अनेक व्यापारी वर्गाने या दोन्ही अनुभवी नेत्यांना निवडून देण्याची ग्वाही दिली आहे. या प्रतिसादाने उत्साहित झालेल्या कासुर्डे व मेमन यांनी विजयासोबतच एका मोठ्या शहर विकासाच्या आव्हानाची जाणीव असल्याचेही सांगितले. पाचगणीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही जोडी सज्ज झाली असून, आता फक्त मतदारांच्या एका निर्णयाची प्रतीक्षा आहे.
📍 तुमचा एक मत, पाचगणीचे भविष्य! विकासाच्या या लढ्यात मेमन-कासुर्डे यांना साथ द्या!

