पाचगणी निवडणूक अंतिम मतदार यादीत लाडक्या बहिणीचा वरचष्मा; महिला मतदार ५४२ ने अधिक महिला फॅक्टर निवडणुकीत महत्वाचा….!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे. या यादीनुसार महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीय वाढली असून, आगामी निवडणुकीत लाडकी बहीण फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. तर नवीन वाढलेले युवा १,३०० मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

 

पांचगणीत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अंतिम मतदार यादीनुसार १०,२०१ मतदार संख्या झाली आहे. यामध्ये महिलांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला मतदारांची संख्या ५,३७४ तर पुरुष मतदारांची संख्या ४,८३२ इतकी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांचा निर्णायक प्रभाव राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पाचगणी पालिकेचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय मतदार यादीवरील सुचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. या सुचना व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया पार पडली. आलेल्या काही हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या. त्यानंतर मतदार यादी अंतिम करण्यात आली असून ती प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय पाहिल्यास प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वाधिक म्हणजे १,७५६ मतदारअसून, प्रभाग क्रमांक ४ मध्ये केवळ ४८५ मतदार असल्याचे दिसून येते. काही प्रभागांमध्ये मतदारांची संख्या तुलनेने कमी असल्याने, या ठिकाणी अटीतटीचा चा किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.कमी मतदार असलेल्या ठिकाणी अटीटतीचा सामना होऊ शकतो.

, “पाचगणीतील लाडक्या बहिणी कोणत्या बाजूला मतदान करतील” हा प्रश्न आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुरुषांच्या पेक्षा महिला मतदार संख्या ५४२ ने अधिक आहे. राजकारणानात बदल घडवतो की काय हे पाहावे लागेल

चौकट :
प्रभाग क्र. १ मध्ये पुरूष २४९ व स्त्री मतदार २५५ असे एकूण ५०४ मतदार असे आहेत. प्रभाग क्र. २ मध्ये पुरूष ४८५ व स्त्री मतदार ४६८ तसेच असे एकूण ९३३ मतदार आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये पुरूष ५७४ व स्त्री ६७६ मतदार असे एकूण १२५० मतदार आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये पुरूष २३० व स्त्री मतदार २५५ आणि असे एकूण ४८५ मतदार आहेत.

प्रभाग क्र. ५ मध्ये पुरूष ८६५ व स्त्री मतदार ८८६ असे एकूण १७५१ मतदार आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये पुरुष ४७४ व स्त्री मतदार ५३३ असे एकूण १००७ मतदार आहेत. प्रभाग क्र. ७मध्ये पुरूष ३३७ व स्त्री मतदार ३०९असे एकूण ६४६ मतदार आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये पुरूष ४३८ व स्त्री मतदार ४७२ असे र एकूण ९१० मतदार आहेत. प्रभाग क्र. ९ मध्ये पुरूष ७४७ व स्त्री मतदार १००९ असे एकूण १७५६ मतदार आहेत.प्रभाग क्र. १० मध्ये पुरूष ४५१ व स्त्री मतदार ५०८ असे एकूण ९५९ मतदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!