स्मार्ट मीटर विरोधात पँथर सेना पुन्हा आक्रमक.; आठ दिवसांचा अल्टिमेटम ; कार्यालयाला टाळे ठोकणार..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भागात व शहर परिसरात महावितरणच्या वतीने स्मार्ट प्रिपेड लाईट मिटर बसविले आहेत.ते काढण्यासंदर्भात १६ सप्टेंबरला अल्टिमेट दिला होता.त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने पुन्हा आक्रमक होत पँथर सेनेनेवाई आज वाई विभागीय कार्यालयात दिलेल्या निवेदनातून ८ दिवसांचा अल्टिमेटम माध्यमातून टाळे ठोकण्याचा सक्त इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे आम्ही आपणाला दिनांक १६ सप्टेंबर रोजी व महाबळेश्वर व जावळी तालुक्यामध्ये काही गावांमध्ये व शहरांमध्ये स्मार्ट प्रिपेड लाईट मिटर बसविलेले आहेत ते काढण्यासंदर्भात तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जावर अद्यापि कारवाई केली गेली नाही नसल्याच्या अनुषंगाने कारवाईचा इशारा दिला आहे.
सर्वसामान्य नागरिक घरी लावलेला प्रीपेड मीटर बदलून घेण्याकरिता महावितरणच्या गेले असता. विभागातील अधिकारी सर्वसामान्य लोकांना अधिकारी अर्वाच्य भाषेत ग्राहकाला सांगतात की आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो प्राव्हेट लोकांनी बदली केला आहे. त्याच्याशी आमच्या कार्यालयाचा संबंध नाही. अशी थातुर मातुर उत्तरे देत आहेत.
महाबळेश्वर जावळी तालुक्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये स्मार्ट प्रिपेड मिटर ८ दिवसात बदली करून जुने मिटर लावले राहीत नाहीत.तर मीटर ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क साधून आपणाविरुध्द जन आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. त्याच्या होणाच्या पुढील परिणामांस आपण व आपले वरिष्ठ अधिकारी स्वतः जबाबदार राहावे असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

