नवरात्रौत्सव उत्सव सांस्कृतिक मिलाप जपतो..शैला टिके – कुलकर्णी; समरप्लाझा येथे रास दांडियाचे आयोजन ; पोलिस स्टेशन व बीट कल्चर अँड डान्स स्टुडिओ संयुक्त उपक्रम..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवरात्र हा केवळ एक उत्सव नाही; तो एक एकात्मता निर्माण करणारी शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमी, भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणते. हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांमध्ये एकता आणि सामायिक वारशाची भावना निर्माण करतो.नवरात्र हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा मिलाप आहे. असे प्रतिपादन ॲक्शन डायरेक्टर शैला टीके कुलकर्णी यांनी केले.

पाचगणी येथील हॉटेल समरप्लाझा हॉल मध्ये पाचगणी पोलिस व बीट कल्चर अँड डान्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे हे द्वितीय वर्ष आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारतातील पहिली महिला ॲक्शन सिने डायरेक्टर शैला टीके कुलकर्णी होत्या. यावेळी व्यासपीठावर पाचगणी पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक, दिलीप पवार, सौ. प्राजक्ता पवार, पोलिस कॉन्स्टेबल शोभा साठे, बीट क्लिक्टरचे संस्थापिका निशिता खांडके, महेश खांडके, कोरिओग्राफर पवन बेरियस, आदी उपस्थित होते.

प्रथमतः प्रमुख पाहुणे शैला टिके कुलकर्णी व सपोनी दिलीप पवार व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले गेल

यानंतर पाचगणी पोलिस स्टेशनचे सपोनी दिलीप पवार यांच्या पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेची पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार रविकांत बेलोशे, व दिलीप पाडळे यांच्या हस्ते पेढ्याचा हार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी अध्यक्ष अमित बोधे, सचिव आदित्य गोळे. रोटरियन किरण पवार, नवदुर्गा महिला पोलिस, पोलिस स्टाफ आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सपोनी दिलीप पवार यांच्या पोलिस दलातील उत्कृष्ट कार्याचा मागोवा घेत. कार्याची स्तुती केली. पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यानंतर महिलांचा रास दांडियांचा कार्यक्रम पार पडला. शहर परिसरातील असंख्य महिला रास दांडिया खेळण्याकरिता आल्या होत्या..
महिलांनी रास दांडिया खेळायचा मनमुराद आनंद लुटला. उत्कृष्ट रास दांडिया विजेत्या महिलाना बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर आभार महेश खांडके यांनी मानले

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!