संघर्षातून तेजोमय प्रकाशित नेतृत्व ज्योत : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा प्रवास..! सामान्यजनांचा बुलंद आवाज : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा कर्तृत्वगौरव..!

Spread the love

कर्तृत्वाचा दाता – गोरगरिबांचा कैवारी, सामान्यजनांचा खंबीर आवाज…
पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाशगोळे म्हणजे केवळ एक लोकप्रतिनिधी नाहीत, ते म्हणजे दुःखात धावून येणारा मित्र,
अडचणीत आधार देणारा भाऊ
आणि आशेचा हात धरून उभा राहणारा माणूस. मैत्री जपणारा दिलदार स्वभावाचा तेजोमय प्रकाश सामान्यांच्या वेदनांना स्वतःच्या हृदयात सामावून घेणारी संवेदनशीलता जपणाऱ्या इतरांच्या आयुष्यात उजेड पसरवणाऱ्या या तेजोमय प्रकाशाचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने या माणुसकीच्या दीपस्तंभाचा हा अल्पसा परिचय…!

कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतीसाठी उभे राहण्याची वृत्ती — यामुळेच ते जनतेच्या मनात “नेतृत्व” म्हणून नाही, तर आपला माणूस म्हणून घर करून राहिले आहेत.गेल्या दहा वर्षांत सामान्यजनांशी जोडलेली नाळ त्यांनी केवळ जपली नाही, तर ती नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून ठामपणे, निर्भीडपणे पोहोचवली. हीच त्यांच्या कार्याची खरी पोचपावती… आणि हीच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख आहे

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेल्या
मार्ली या छोट्याशा खेडेगावात प्रकाश गोळे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…दैनंदिन जगणेही संघर्षाचे.
त्या कठीण काळात त्यांच्या मातोश्री
सौ. सुमन गेणदेव गोळे, पिताश्री श्री.गेणदेव गोळे यांनी हिंमत हरली नाही. पोटासाठी, भविष्यासाठी आणि लेकरांच्या स्वप्नांसाठीकुटुंबासह पाचगणीची वाट धरली.
पाचगणीत मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतानाआईने आपले दुःख लपवले,
पण लेकरांच्या डोळ्यांत स्वप्ने जपली.
प्रकाश गोळे यांनीही संघर्ष अनुभवला,
पण मातोश्रींनी कधीही उणीव भासू दिली नाही.

स्वतःच्या आयुष्यात भोगलेल्या हालअपेष्टा
इतरांच्या वाट्याला येऊ नयेत — हा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजत गेला. याच विचारातून जन्माला आली सेवेची भावना आणि त्याच भावनेने प्रेरित होऊन ते सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून देऊ लागले. यासाठी त्यांना त्यांचे लहान बंधू मिनीज चिक्कीचे सर्वेसर्वा प्रवीण गेणदेव गोळे यांची मोलाची साथ मिळाली आहे या दोन्ही बंधूंच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. म्हणूनच प्रकाश गोळे यांनी इथपर्यंतचा यशोमय प्रवास गाठला आहे.

२०१६ साली मिळाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, फक्त जनसामान्यांच्या प्रेमाच्या बळावर त्यांनी आपल्या मातोश्रींना निवडणुकीत विजयी करून आणले.

हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले—
कारण त्यांच्या मागे सत्ता नव्हती,
तर जनतेचा विश्वास होता. त्यानंतर समाजकार्यालाच जीवनाचे ध्येय मानून
ते अविरत झटत राहिले. सलग दहा वर्षे
सामान्यांच्या प्रश्नांसाठी झोप, वेळ, स्वतःचा आराम सगळे बाजूला ठेवून ते उभे राहिले.
कोरोनासारख्या भयावह काळात वैद्यकीय मदत असो किंवा अर्ध्या रात्री आलेली मदतीची हाक — प्रकाश गोळे हे नाव धावून येणाऱ्या आशेचं प्रतीक बनलं. याच विश्वासाच्या बळावर
ते पाचगणी नगरपरिषदेचे नगरसेवक झाले.

इतकेच नव्हे, तर आपल्या पत्नीला देखील
पाचगणी नगरपरिषदेत एक नंबरचे मताधिक्य मिळवून विजयी करून आणण्याचा मान त्यांनी मिळवला.पहिल्याच प्रयत्नात
उपनगराध्यक्षपदाची खुर्ची मिळवणेहे केवळ यश नाही – ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे,
सेवाभावाचे आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण आहे.असा कर्तृत्वाचा, सेवेचा आणि माणुसकीचा तेजोमय प्रकाश सदैव सर्वसामान्यांचे आयुष्य उजळत राहो..! या वाढदिवसानिमित्तया जनतेच्या कैवारी नेतृत्वाला मनःपूर्वक, हृदयातून शुभेच्छा!
शब्द संकलन शब्दांकन : दिलीप पाडळे (पाचगणी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!