प्रभाग क्रमांक ८ मध्ये शक्तिप्रदर्शनात प्रचाराची सांगता; विकास हाच केंद्रबिंदू, विजयाचा ठाम आत्मविश्वास! – इंद्रायणीनगर–गवळीमाथा–बालाजीनगर दुमदुमले; प्रभाग ८ मध्ये सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांचा विजयी निश्चित…!

Spread the love

– निर्धारशक्ती, संघटन आणि विकासाचा त्रिवेणी संगम; प्रभाग ८ मध्ये विजय निश्चित

– जाहीर पाठिंब्यांचा पाऊस; प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार समारोप

 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा इंद्रायणीनगर | (प्रतिनिधी) :- प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांच्या प्रचाराची सांगता भव्य शक्तिप्रदर्शन आणि जल्लोषात करण्यात आली. संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण असून, “विकास हाच केंद्रबिंदू” या ठाम भूमिकेसह विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला..

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांच्या गजरात, शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “शिवसेना जिंदाबाद”, “सरिता ताई आगे बढो” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

या वेळी प्रभाग क्रमांक ८ मधील विविध मंडळे, सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवक संघटना यांनी सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. स्थानिक प्रश्नांची जाण, सातत्याने जनतेत राहून केलेले कार्य, तसेच पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणामुळे त्यांना हा व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

सरिता कुऱ्हाडे–गोरडे म्हणाल्या की, “हा प्रभाग माझे कुटुंब आहे. इथल्या प्रत्येक समस्या, प्रत्येक गरज मला माहित आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी संधी निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे. केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम करून दाखवण्याची शिवसेनेची परंपरा आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची कामे, पाणीटंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न, स्वच्छता व्यवस्था, झोपडपट्टीतील प्रश्न, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना आणि युवकांसाठी क्रीडा व रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर विशेष भर दिला जाईल.

“विकास हा कोणत्याही राजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचार सांगता कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक या वेळी उपस्थित होते. सर्वांनी एकसुरात विजयाचा विश्वास व्यक्त करत, प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणारच, असा निर्धार व्यक्त केला.एकूणच, प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचाराची सांगता ही केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, जनतेच्या विश्वासाचे आणि ताकदीचे भव्य शक्तिप्रदर्शन ठरले. आता मतदानाच्या दिवशी मतदार कौल देऊन विकासाच्या बाजूने कौल देतील, असा ठाम विश्वास शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!