वाळंजवाडीचे सरपंच उमेश पाडळे यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा
वाळंजवाडी : ५ जानेवारी २०२६ रोजी वाळंजवाडी गावचे सुपुत्र व विद्यमान सरपंच श्री. उमेश मारुती पाडळे यांचा ५० वा वाढदिवस (सुवर्णमहोत्सव) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला.

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ वाळंजवाडी, मुंबई मंडळ, महिला मंडळ तसेच सूर्यकिरण युवा मंडळ वाळंजवाडी यांची विशेष उपस्थिती होती.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यामध्ये श्री. ज्ञानदेव रांजणे (DCC बँक संचालक), श्री. सुनील शिंदे (विद्यमान नगराध्यक्ष, महाबळेश्वर), अॅड. संजय जंगम (नगरसेवक), श्री. अफझलभाई सुतार (नगरसेवक), रोहित ढेबे (नगरसेवक), एकनाथ ओंबळे (शिवसेना उपजिल्हा प्रमुख), सूर्यकांत शिंदे (चेअरमन, साई नागरी पतसंस्था), युसुफभाई शेख (माजी नगराध्यक्ष), तौफिक पटवेकर (समाजसेवक), अनिकेत रिंगे, संतोष चोरगे (समाजसेवक), अतिश कदम (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी पक्ष), सागर दादा धनावडे, विकास ओंबळे, विकी दळवी, योगेश दळवी (भाजप कार्यकर्ते), संकेत पाटील (सातारा जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सरपंच सचिन बैलकर, केडबे गावातील मान्यवर बंडू मुकादम, सचिन उंबरकर (महाबळेश्वर) यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पोलीस व अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा उमेश पाडळे यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला. यावेळी वक्त्यांनी त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “उत्कृष्ट हसरे व्यक्तिमत्त्व, गावाबद्दल अपार प्रेम आणि काम करण्याची जिद्द” या शब्दांत सरपंच उमेश पाडळे यांचा गौरव करण्यात आला.
‘सूर’ संगीताच्या मधुर साथीत हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. शेवटी आभारप्रदर्शन करून या भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.

