मतदान करा, बोटाला शाई दाखवा आणि मिळवा सवलत! पाचगणीत पुरोहित नमस्ते अनोखी मतदार प्रोत्साहन मोहीम

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी पाचगणीतील पुरोहित नमस्तेची खास उपक्रम. मतदान करून बोटाला शाई लावलेली खूण दाखवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला खाद्यपदार्थांवर विशेष सवलत देण्याची घोषणा करून त्यांनी लोकशाही उत्सवात अनोखे योगदान दिले आहे.

मतदानाच्या दिवशी ग्राहकांनी फक्त बोटावरील शाईची खूण दाखवायची आणि लगेच सवलतीचा लाभ मिळणार, असे भारतभाई पुरोहित यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मतदार, तरुणांसह पर्यटकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

 

“लोकशाही मजबूत व्हावी, प्रत्येक नागरिकाने मतदानाला प्रोत्साहन द्यावे, यासाठी ही छोटीशी सामाजिक जबाबदारी,” अशी प्रतिक्रिया पुरोहित लंच होमकडून देण्यात आली. शहरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाचगणीत या अनोख्या मोहिमेमुळे निवडणूक वातावरणात उत्साहाचे नवीन रंग भरले आहेत. तर प्रत्येक निवडणुकीत पुरोहित नमस्ते हा आपला अनोखा उपक्रम राबवित आहेत..!

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!