प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना ‘घरोघरी’ पाठिंबा; मेणबत्ती चिन्हावर विजयाची मोहोर!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून, प्रभाग क्रमांक २ मध्ये अपेक्षेप्रमाणेच नरेंद्र बिरामणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. बिरामणे यांना मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता, त्यांच्या विजयाची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे.


उमेदवारांना आजच चिन्हांचे वाटप झाले, ज्यात बिरामणे यांना ‘मेणबत्ती’ हे प्रभावी चिन्ह मिळाले आहे. निवडणुकीला अवघे चार दिवस उरले असताना, बिरामणे यांनी तात्काळ ‘मेणबत्ती’ चिन्ह घेऊन प्रभागभर ‘घर टू घर’ प्रचाराचा धडाका लावला आहे. या रणधुमाळीत बिरामणे यांनी केवळ चिन्ह पोहचवले नाही, तर प्रभागातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या आणि प्रश्न अत्यंत आपुलकीने जाणून घेतले.


नागरिकांनीही आपल्या प्रभागातील पाणी, रस्ते आणि इतर समस्या त्यांच्यासमोर उघडपणे मांडल्या, ज्यामुळे त्यांचे बिरामणे यांच्याशी भावनिक नाते तयार झाले आहे. नागरिकांकडून मिळत असलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला आहे.
बिरामणे यांच्या प्रचारयंत्रणेत त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेली मेहनत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ निर्णायक ठरली आहे. त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे प्रभाग २ मध्ये मेणबत्ती चिन्हाचा प्रचार झंझावाताप्रमाणे पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त आणि वाढता पाठिंबा स्पष्ट संकेत देत आहे की, या निवडणुकीत मेणबत्ती चिन्हाची ‘रोषणाई’ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!