स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते , समाजभूषण स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त( दि २७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रित संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतिन भिलारे , संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी या निमित्ताने केले आहे.

हिलरेंज हायस्कूल भिलार येथे सकळी 10 वाजता स्व.बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर 10 ते 12 सुस्वर भजनांचा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे,
दुपारी 3 वाजता मदत आणि पुनर्वसन मंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार या विद्यालयाच्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे व माजी सभापती संजय गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!