महाबळेश्वर तालुक्यात भाजपला मोठे बळ; विविध पक्षांतील पदाधिकारी व ग्रामस्थांचा जाहीर प्रवेश

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये सामील होत असल्याने तालुक्यात भाजपचे संघटनात्मक बळ लक्षणीयरीत्या वाढले आहे. या घडामोडींचा थेट फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला होईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व काँग्रेसचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष किसनशेठ भिलारे यांच्यासह पारुठचे सरपंच आणि वेंगळे, पार, मेडतळे येथील अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडून आला आहे.

भिलार येथील किसनशेठ भिलारे, पारुठचे सरपंच सुनील विश्वनाथ संकपाळ, वेंगळे गावचे विठ्ठल रामचंद्र सकपाळ, गणपत लक्ष्मण सकपाळ, सागर गणपत सकपाळ, आनंद जानकू कदम, संजय महादेव कदम, राजू भागू सकपाळ, मेडतळे येथील विठ्ठल शिंगटे, भाऊ शिंगटे, लक्ष्मण शिंगटे, तुकाराम शिंगटे, तसेच शिवाजी रघुनाथ राजापुरे (पार), विलास जाधव (प्रतापगड), संदीप राजपुरे (कुंभरोशी), सलमान अकबर मुलाणी, सुनील मारुती तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना उपस्थित मान्यवरांनी भाजपची विकासाची ध्येयधोरणे व केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली.

या प्रवेशप्रसंगी महाबळेश्वर (पूर्व) मंडळ अध्यक्ष अनिल नाना भिलारे, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, सुभाष मारुती सोंडकर, गोविंद देवजी सकपाळ, सुरेश हरिभाऊ जाधव, सौ. रंजना संजय कदम, सौ. सुप्रिया अनिल भिलारे, सौ. अमिना नदीम शारवान आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून आगामी निवडणुकांमध्ये एकसंघपणे काम करण्याचे आवाहन केले.

या जाहीर प्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, संघटनात्मक पातळीवर पक्षाला नवे बळ मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!