पाचगणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे १५ व्या व्याख्यानमालेचे नियोजन पूर्ण; १५ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मीनलबेन मेहता महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे यंदा १५वे वर्ष असून या व्याख्यानमालेच्या नियोजनासाठीची महत्त्वपूर्ण बैठक आज मीनलबेन विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत येत्या १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या तीन दिवसीय शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेसाठी पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मा. जयवंत भिलारे, उपाध्यक्षपदी निशिता खांडके मॅडम, सचिवपदी पुनम कांबळे मॅडम यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून मनोहर देशमुख, कार्यवाहक म्हणून मा. जे. के. अमराळे, सहकार्यवाहक म्हणून मा. जानू पांगरी, सहसचिव म्हणून मा. अशोक पाटील तर खजिनदारपदी मा. राजेंद्र भिलारे (आबा) सह खजिनदार उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई, उपपाचार्य डॉ. बाळासाहेब कोकरे ,
माणिक वांगीकर, महाविद्यालन व्याख्यानमाला कमिटी प्रमुख ऋषिकेश देशमुख, सेवानिवृत प्राध्यापक मानाजी शिंदे, मुख्याध्यापक वर्णे सर, पत्रकार दिलीप पाडळे, तसेच महाविद्यालचा प्राध्यापक स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिकांना वैचारिक प्रेरणा मिळणार असून पाचगणीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनात या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या बैठकीत कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई सर यांनी केले. त्यांनी व्याख्यानमालेच्या पंधरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत, यंदाचा उपक्रम अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शेवटी मान्यवरांचे आभार माणिक वांगीकर सर यांनी केले.

