पाचगणी नगरपरिषदेत सत्तांतराचा राजकीय भूकंप ; राष्ट्रवादी नेतृत्वाची रणनीती यशस्वी, १५ वर्षांची एकहाती सत्ता उद्ध्वस्त
(सविस्तर विश्लेषण 🙂
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या राजकारणाची दिशा बदलणारा हा निर्णायक टप्पा आहे. तब्बल १५ वर्षे चाललेली एकहाती सत्ता कोसळवत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्षांनी नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण २१ जागांपैकी तब्बल १५ जागांवर घवघवीत यश मिळवत विरोधी कऱ्हाडकरा गटाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. यामागे राष्ट्रवादी नेतृत्वाची छुपी रणनीती लपलेली आहे.

ही निवडणूक केवळ संख्याबळाची नव्हे, तर रणनीती, संयम आणि अचूक नियोजनाची ठरली. या विजयामागे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांचे सूक्ष्म, चाणाक्ष आणि शांत डोक्याने आखलेले नियोजन निर्णायक ठरले. विरोधकांना गाफील ठेवत निवडणूक लढवण्याची ही रणनीती अखेर निर्णायक ठरली.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. पाचगणी नगरपरिषद ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली होती. राजकारणाचे धडे स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या मुशीत गिरवलेल्या मकरंद पाटील यांच्या राजकीय शैलीला साजेसे नेतृत्व राजेंद्र शेठ राजपुरे यांनी मैदानात उतरवत हे ‘शिवधनुष्य’ लीलया पेलले.
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर पाचगणी नगरपालिकेची सत्ता मिळवून मकरंद पाटील यांना हे राजकीय ‘गिफ्ट’ देण्यात आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली ही निवडणूक म्हणजे ‘कमी आवाज, जास्त परिणाम’ याचे उत्तम उदाहरण ठरली. योग्य उमेदवारांची निवड यामुळे विरोधक आपल्या विजयाचा डंका पिटत असतानाच बाजी मात्र राष्ट्रवादी प्रणित अपक्षांनी मारली.
विजयी उमेदवार – मतदारांचा स्पष्ट कौल
या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्षांना जनतेने दिलेला स्पष्ट विश्वास आहे.
नगराध्यक्ष : दिलीप बगाडे (२६७१ ) मते २ चे मताधिक्य
प्रभाग निहाय निकाल : राष्ट्रवादी प्रणित अपक्षांनी घेतलेली मते आणि विजयी मताधिक्य..
प्रभाग क्र. १ ‘ब’ – राजश्री सणस – (१८६) ७३ चे मताधिक्य
प्रभाग क्र. २ ‘अ’ – सुप्रिया माने – (४५५) १७२ चे मताधिक्य.
प्रभाग क्र. २ ‘ब’ – नरेंद्र बिरामणे – (४३६) चे १६१ चे मताधिक्य
प्रभाग क्र. ३ ‘अ’ – आकाश बगाडे – (४३१) ५ चे मताधिक्य
प्रभाग क्र. ३ ‘ब’ – विमल भिलारे – (४६०) १९० चे मताधिक्य
प्रभाग क्र. ४ ‘अ’ – परवीन मेमन – (१९८) ४८ चे मताधिक्य,
प्रभाग क्र. ४ ‘ब’ – शेखर कासुर्डे – (२४८) १४८ चे मताधिक्य,
प्रभाग क्र. ६ ‘अ’ – माधुरी कासुर्डे – (३७३) ३२ चे मताधिक्य.
प्रभाग क्र. ६ ‘ब’ – राजेंद्र पारटे – (३३६) १६५ चे मताधिक्य
प्रभाग क्र. ८ ‘अ’ – अमित कांबळे – (२६३) ११ चे मताधिक्य
प्रभाग क्र. ९ ‘अ’ – स्वाती कांबळे – (५०२) १९० चे मताधिक्य
प्रभाग क्र. ९ ‘ब’ – प्रकाश गोळे – (५७५) ३ चे मताधिक्य
प्रभाग क्र. १० ‘अ’ – महेश खांडके – (३६४) ७४ चे मताधिक्य
प्रभाग क्र. १० ‘ब’ – अमृता गोळे – (५७१) ३६५ चे मताधिक्य
(निष्कर्ष)
पाचगणी नगरपरिषद निवडणूक ही केवळ सत्तांतराची नव्हे, तर जुने राजकीय गणित मोडून काढणारी निवडणूक ठरली आहे. १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणत राष्ट्रवादी प्रणित अपक्षांनी जनतेचा विश्वास मिळवला आहे. आता या विश्वासाचे रूपांतर विकास, पारदर्शक कारभार आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीत कसे होते, याकडे संपूर्ण पाचगणीचे लक्ष लागले आहे.

