पाचगणीमध्ये ब्रम्हाकुमारीज नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ ; ६ दिवसाच्या अभियानात २५ ठिकाणी कार्यक्रमाद्वारे जनजागृती…!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करीत नशामुक्ती अभियानांतर्गत १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला गेला..!

पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या नाशमुक्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक प्रवीण बोधे, सीमा कासुर्डे, ब्रम्हाकुमारीज क्रिना दिदी, तेजश्री दिदी, साधना दिदी, जयंती गुजर, अमृत चव्हाण, बी. के.वसंत, प्रवीण मालुसरे, बी. के. वसंत, खुर्शीद सातारवाला, अजित कुटरे, सुजाता भणगे, बी. के शोभा, आदी उपस्थित होते.
आजपासून १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान हे ६ दिवस नशामुक्ती अभियानांतर्गत २५ कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम हॉटेल, शाळा, कंपन्या, मध्ये राबवून नशामुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. त्याच बरोबर आध्यात्मिक मार्गदर्शन व सोबत नशामुक्तीचे मोफत होमिओपॅथिक औषध दिले जाणार आहे. तर डिजिटल स्क्रीन असलेल्या गाडीद्वारे नशामुक्ती जनजागृती अभियान या ६ दिवसात राबविले जाणार आहे. ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने सांगतले आहे.
या अभियानाचा उद्देश युवकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे हा आहे. “नशामुक्त जीवन – निरोगी समाज” या संदेशासह ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या साधक-साधिकांनी ध्यान, सकारात्मक विचार आणि आत्मिक शांतीद्वारे व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी नशामुक्तीचे संदेश असलेले फलक, पत्रके वितरित करण्यात आली. तसेच नागरिकांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती व नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या या उपक्रमाचे पाचगणीकरांनी स्वागत करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला.

