पाचगणीमध्ये लक्ष्मी दर्शनाने लागलेल्या रांगा कोणाच्या पत्थी पडणार..? निवडणूक पश्चात चर्चांना उधाण..!!.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी २ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर ७९०१ मतदारांचे मतदान ईव्हीएम मशीन मध्ये लॉक झाले. यामध्ये ३,८१२ पुरुषांनी तर ४०८९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. असून यामध्ये पुरुषांपेक्षा २७७ मतदान महिलां फॅक्टरचे अधिक आहे. संपूर्ण मतदान ७७.४५ टक्के मतदान झाले आहे. यावर्षी इंट्रव्हल नंतर लक्ष्मी दर्शनाने मतदान केंद्रावर मतदारांच्या लागलेल्या रांगा कोणाच्या पत्थी पडणार..? निवडणूक पश्चात चर्चांना उधाण…!

पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. यामध्ये ७७.४५ टक्के मतदान झाले असून नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये लक्ष्मी कऱ्हाडकर गटाचे संतोष कांबळे तर राष्ट्रवादी पुरस्कृत दिलीप बगाडे तर अपक्ष सुनील बगाडे, दिपक कांबळे, सुनील कांबळे, विजय वन्ने, हे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार हे पहाण्याकरीता थोडी वाट पहावी लागणार आहे.
सर्वाधिक मतदान..
केंद्र क्रमांक १३ मध्ये प्रभाग १० साठी ८२ .०६ टक्के हे १३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झाले. येथे प्रामुख्याने महेश खांडके, व नामदेव चोपडे, दिलावर बागवान, योगेश जानकर यांच्यामध्ये चुरस आहे. तर महिलांमध्ये अमृता गोळे व शशिकला कासुर्डे यांच्या टक्कर होणार आहे. हे मतदान कोणासाठी यशाची किल्ली घेऊन येणार हे पहावे लागेल..
सर्वाधिक कमी मतदान
प्रभाग क्रमांक ९/२, केंद्र क्रमांक १२ मध्ये ७०. २०,टक्के मतदान झाले आहे. येथून प्रकाश गोळे, अर्जुन जेधे, हेन्री जोसेफ, जॉन जोसेफ, दिलीप टेके, रंजन कांबळे, आदी नशीब अजमावित आहेत..
मतदान केंद्रनिहाय मतदान…
केंद्र क्रमांक १/१) ७९.९६, टक्के, केंद्र क्रमांक २/१) ७९.३१, टक्के, केंद्र क्रमांक ३/१) ८०.५४, टक्के, केंद्र क्रमांक ३/२) ८०.१०, टक्के, केंद्र क्रमांक ४/१) ७२.७८, टक्के, केंद्र क्रमांक ५/१) ७५.९५, टक्के, केंद्र क्रमांक ५/२) ७६.१८, टक्के, केंद्र क्रमांक ६/१) ७७.३६, केंद्र क्रमांक ७/१) ७८.९५, टक्के, केंद्र क्रमांक ८/१) ७३.९६, टक्के, केंद्र क्रमांक ९/१) ८०.२३, टक्के, केंद्र क्रमांक ९/२) ७०.२०, टक्के, केंद्र क्रमांक १०/१) ८२.०६ टक्के, असा प्रकारे १३ केंद्रावर मतदान झाले असून याची संपूर्ण टक्केवारी ७७.४५ एवढी उच्चांकी झाली आहे..

