संतोष भाऊ कांबळेना मुस्लिम फ्रंटचा बिनशर्त पाठिंबा ; संतोष भाऊंचा बोलबाला वाढला.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे पाचगणी दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या दौऱ्यादरम्यान आगामी पाचगणी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. पाचगणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. संतोष भाऊ कांबळे यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेतर्फे बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.

स्थानिक विकास, सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा यांना बळकटी देणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर, ज्येष्ठ सल्लागार शाहाजी सावंत साहेब, हंसराज बनसोड दादा, खजीनदार हरफान भाई शेख, कोर कमिटी सदस्य अकबर खान साहेब, महाबळेश्वर महिला अध्यक्षा सुमैया शेख, पंचगणी अध्यक्षा रईसा मॅडम, सुरैया आपा तसेच इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेने आगामी आगामी निवडणुकीत सकारात्मक बदल आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आ
हे.

