मंत्री मकरंद (आबा) पाटलांचा उमदेवारांना कानमंत्र ; प्रभाग भेटीत विकासासाठी पाचगणीकरांना भावनिक साद..!.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक स्थळ असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता आणा मी पाचगणीचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी पाचगणीकरांना भावनिक साद ; तर निवडणुकीतील उमदेवारांना कानमंत्र ना. मकरंद आबा पाटलांनी प्रभाग फेरी दरम्यान दुहेरी संवाद साधला..

पाचगणी नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेच्या पॅनलतर्फे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार दिलीप भाऊ बगाडे यांना संधी देण्याचे कळकळीचे आवाहन पॅनलचे नेते मकरंद पाटील यांनी समस्त पाचगणीकरांना केले आहे.
मकरंद पाटील यांनी यावेळी दिलीप भाऊंचे व्यक्तिमत्व अत्यंत शांत, मनमिळावू असून ते समाजातील सगळ्यांच्यात मिसळणारे आणि सर्व समाजाची मान्यता असणारे, तसेच स्वच्छ चारित्र्य असलेले उमेदवार असल्याचे सांगितले. अशा उमेदवाराला नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास पाचगणीचा सर्वांगीण विकास करणे शक्य होईल. असे आवाहन त्यांनी केले.
दिलीप भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर आणि पॅनलचे सर्व नगरसेवक आपण सगळ्यांनी निवडून आणल्यानंतर निश्चितपणानं या पाचगणीचा जो काही विकास रखडला आहे, तो भविष्यात शंभर टक्के मार्गी लावण्यात येईल. विशेषतः, पाचगणीच्या पर्यटन स्थळांचा अधिकाधिक विकास कसा होईल, या दृष्टीने अतिशय ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती मधील भाजप आणि शिवसेना हे मित्र पक्ष विरोधात असल्याचे विचारलेवर सांगताना पाटील यांनी सांगितले की, पाचगणीमध्ये प्रत्येक पक्ष आणि महाआघाडीतील घटक पक्ष जरी वेगवेगळी निवडणूक लढवत असली, तरी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे लोक एकत्रित येऊन हे पॅनल उभे केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विचाराच्या सगळ्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवा.
पाचगणी शहराच्या समस्यांवर बोलताना ना. पाटील म्हणाले ‘आजपर्यंत माझ्या विचाराचे नगराध्यक्ष नव्हते. त्यामुळे, पाचगणीकरांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की, फक्त एकदा माझ्या विचाराचा नगराध्यक्ष बनवा. मी तुम्हाला हमी देतो की, पाचगणीच्या ज्या काही समस्या आहेत, त्या निश्चितपणाने मार्गी लावू,’ असे भावनिक आवाहन मकरंद पाटील यांनी मतदारांना केले आहे.

