पाचगणीचा अनुभवी चेहरा! उपनगराध्यक्षांचे काम पाहिलेल्या पाचगणीकरांचा कौल कुणाला? बगाडेंची भावनिक साद: साथ द्या, विकासाची दिशा कायम ठेवू!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी रंगत वाढली असून, चिन्ह वाटप होताच सर्वच उमेदवार प्रचारासाठी सरसावले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अनुभवी उमेदवार दिलीप भाऊ बगाडे यांनीही आपले ‘कपबशी’ चिन्ह मिळताच प्रचारात आघाडी घेतली आहे. पाचगणीच्या विकासासाठी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

युवाशक्तीचा मोठा पाठिंबा:
पाचगणी शहरातील विविध प्रभागांत दिलीप भाऊ बगाडे यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराचा धुरळा उडवला असून, त्यांना नागरिकांकडून, विशेषतः युवकांकडून, मोठा प्रतिसाद मिळत आहे. एक अनुभवी आणि शहराच्या समस्यांची जवळून जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव पाठीशी:
यापूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या अनेक कामांची आठवण आज सर्व पाचगणीकरांना आहे. हाच कामाचा अनुभव आणि विश्वास आता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. “आपण याच कामगिरीच्या माध्यमातून विकासाची दिशा पुढे चालू ठेवणार आहोत,” असा ठाम विश्वास दिलीप भाऊ बगाडे यांनी व्यक्त केला.
मकरंद आबांच्या नेतृत्वाखाली विकसनशील पाचगणीचे स्वप्न:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ‘विकसनशील पाचगणी’चे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे बगाडे यांनी स्पष्ट केले. “पाचगणीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी मला आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले.
पाचगणीकरांनी ‘कपबशी’ चिन्हाला साथ देऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा, अशी कळकळीची विनंती दिलीप भाऊ बगाडे करत आहेत.

