अखेर ठरलं ..! लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला संतोष कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्फत..;
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत मोठा ट्विस्ट होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याने माजी नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या गटाकडून कोण ? याबाबत उलटसुलट चर्चा चालू होत्या. परंतु आज लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांनी आपला उमेदवार संतोष कांबळे असल्याचे आज जाहीर केले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या लढतीचे सर्व संकेत स्पष्ट झाले.

याबाबत आज नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांनी पत्रकारांशी बातचीत करताना माझा अध्यक्षपदाचा उमेदवार हा संतोष कांबळे असून प्रचारालाही आम्ही प्रारंभ केला असल्याचे त्यांनी सांगितले. पाचगणी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच sc आरक्षण पडल्याने या आरक्षणाच्या समाजात उत्साहाचे वातावरण पसरले होते. यामुळे या लढतीसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या . पण अध्यक्षपदासाठी निवडून येणे तितके सोपे नसल्याने अनेक इच्छुकांनी राष्ट्रवादीकडे मुलाखती दिल्या. त्यानंतर सौ लक्ष्मी कराडकर यांनी सुधा इच्छुकांमध्ये चाचपणी केली.
राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करून मैदानाची रंगत वाढवली. त्यामुळे लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या बाजूने कोण याबाबत चर्चा संपूर्ण पाचगणीत सुरू होत्या. आज लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी मात्र संतोष कांबळे यांना आपली उमेदवारी जाहीर करून कोंडी फोडली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप भाऊ बगाडे आणि लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे कडून संतोष कांबळे यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे..

