कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नचिकेतासच्या ‘भावना’ ची उंच भरारी!; विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला !

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : वेग आणि संतुलनाची अचूक सांगड घालत पाचगणी येथील नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व अॅस्टॉन होस्टेलची विद्यार्थिनी कु. भावना विकास बेलोशे (इ. ९वी) हिने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोल्हापूर विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५-२६ मध्ये भावनाने द्वितीय क्रमांक पटकावत नचिकेतास हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक जिल्ह्यांतील अव्वल स्केटर्समध्ये तगडी स्पर्धा असतानाही भावनाने अत्यंत दमदार प्रदर्शन करत आपले अफाट कौशल्य आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली.

 

भावनाच्या या नेत्रदीपक यशामुळे नचिकेतास परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तिच्या या यशाबद्दल हायस्कूलचे चेअरमन अमर बिरामणे, विभागीय क्रीडा शिक्षक मनोज पवार, तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 

भावनाने स्पर्धेत दाखवलेला अद्वितीय वेग, तिची जिद्द आणि आत्मविश्वास पाहता तिच्याकडून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!