प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीमध्ये निवडणूक प्रचाराचे वारे जोरात वाहत असून प्रभाग क्रमांक २ ( ब ) उमेदवार नरेंद्र विजय बिरामणे यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला असून ते प्रत्येक ठिकाणी भेट देत असून त्यांच्या कोपरा बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

पाचगणी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला रंगत आली आहे. प्रभाग क्रमांक २ ( ब ) चे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष राहिलेले नरेंद्र विजय बिरामणे, पुन्हा एकदा नगरपालिकेच्या रणांगणात उभे आहेत. सध्या ते आपला प्रचार करीत असून प्रभागात घरभेटी देऊन नागरिकांना भेटत आहेत. त्यांना प्रचारात नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
या दरम्यान नरेंद्र बिरामणे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तर नागरिकही आपल्या अडीअडचणी बिरामणे यांना सांगत आहेत. नरेंद्र बिरामणे मागील पंचवार्षिक मध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम केल्याने त्यांना प्रश्नाची उत्तम जाण आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रत्येक नागरिकांशी त्यांची जोडली गेलेली नाळ प्रचारात दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिक उत्स्फूर्त सहभागी होत आहेत..

