पर्यावरण पूरक दीपावलीकरिता हिलरेंज विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील; नैसर्गिक स्तोत्रांचा सुयोग्य वापर…
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार , तालुका महाबळेश्वर येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले.

दीपावली काही दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. दिवाळी सनानिमित्त घराघरात मुख्य असतो तो म्हणजे आकाश कंदील हा आकाश कंदील कसा करावयाचा याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन(दादा) भिलारे, सचिव जतीन भिलारे , संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, हिलरेंज माध्यमिकचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक शांताराम जाधव यांनी आकाश कंदील बनविण्याचे कृतीयुक्त प्रशिक्षण मुलांना दिले.
या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या सुमारे एकशे सत्तर मुलांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष आकाशकंदील बनविले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे, महेश ननावरे, राजू मोरे ,विनायक बगाडे, कल्पेश गायकवाड, संगीता खरात, सुजाता पारठे, योगिता रांजणे ,शांताराम जाधव उपस्थित होते.

