माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठ स्पीकरपदी निवड… नवी दिल्ली येथे परिषदेला संबोधित करणार..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे नगरपरिषदेतील स्वच्छतेतील उत्कृष्ट काम आणि लिडरशिप अंगीकृत नेतृत्वगुण याची दखल घेऊन त्यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी दिल्ली येथील ARISE सिटीज फोरममध्ये या परिषद करिता त्यांची स्पीकर म्हणून निवड झाली आहे. त्या या परिषदेला संबोधित करणार आहेत. तर यानिमित्ताने पाचगणीला आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंजणार आहे.

ICLEI दक्षिण आशियाने नवी दिल्ली येथे पहिल्या ARISE सिटीज फोरम २०२५ चे आयोजन केले आहे. ‘स्ट्रेंथनिंग ग्लोबल साउथ लीडरशिप इन लोकली-लेड अॅडॉप्टेशन फॉर क्लायमेट रेझिलियन्स’ या सत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन करण्यासाठी सौ कहऱ्हाडकर याना आमंत्रित केले आहे. यामुळे पाचगणी शहराबरोबरच जिल्ह्याचे नाव देशपातळीवर सन्मानित झाले आहे.
ही संस्था दक्षिण आशिया आणि ग्लोबल साउथमधील शहरांमधील हवामान यावर काम करणाऱ्या नेतृत्वाना एक धाडसी शहरी लवचिकता अजेंडा तयार करण्यासाठी बोलावला आहे. ARISE-अनुकूलनशील, लवचिक, नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि समतापूर्ण-संवाद, सहकार्य आणि हवामान महत्त्वाकांक्षेसाठी प्रदेशाचे प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करत आहे. भारताच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा थिंक टँक, राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA), आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी अधिकृत भागीदार आहे. या कार्यक्रमाचा समारोप ‘दिल्ली घोषणापत्र’ मध्ये हिट आहे.
या कार्यक्रमासाठी सौ कहऱ्हाडकर याना निमंत्रित करण्यात आले आहे. या ठिकाणीही आपला स्वच्छतेविषयीचा अनुभव त्यांना सादर करता येणार असून येथेही आंतरराष्ट्रीय स्तरावर सौ. कहऱ्हाडकर सर्वांचीच मने जिंकतील यात शंका नाही.

