स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ आरोग्य अभियानाचा पाचगणी शहरातील महिला व मुलांनी लाभ घ्या : प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकारतर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे. पाचगणी शहरातील महिला व मुलांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र व पाचगणी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर पालिका शाळेमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी पाचगणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मिथीला बेलोशे, नाक कान घसा तज्ञ डॉ समिर बेलोशे, डोळे तज्ञ उमेश मुळे, सतिश गुजर, नगरपालिका अधीक्षक अधिकारी प्रणव पवार, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुरेश मडके, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, आरोग्य कर्मचारी संजय काळे, रोहित निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह रक्ताच्या चाचण्या आयुष्य भारत कार्ड ईत्यादी सेवा देण्यात आल्या. त्याचबरोबर रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे यांच्या मार्फेत ८ क्षयरूग्णांना फुड बास्केट वाटप करण्यात आले. या शिबीरास शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्गाचे तसेच अंगणवाडी कार्यकर्ते व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

