इंडियन डेंटल असोसिएशन वाई-पांचगणी शाखेचा ‘स्थापना समारंभ’ मोठ्या उत्साहात संपन्न; संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन झगडे, डॉ. अमर कित्तुरकर यांनी सिक्रेटरी तर डॉ. आशिष चोपडे यांनी खजिनदारपदाचा स्विकारला पदभार…
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: वाई येथे कन्या शाळेच्या सत्यवती सभागृहात इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पांचगणी शाखेचा स्थापना समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वाई पाचगणी शाखेच्या पहिल्या वैज्ञानिक सत्रासाठी भारतातील आघाडीचे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि मायक्रोव्हस्कुलर सर्जन डॉ. विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
IDA-वाई-पांचगणी शाखेने आपले कामकाज अगोदरच सुरु केले असून वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवण्यास सुरुवात केली आहे. या शाखेचा पदभार डॉ. मोहन झगडे (संस्थापक अध्यक्ष) डॉ. अमर कित्तूरकर (सिक्रेटरी) व डॉ. आशिष चोपडे (खजिनदार) यांनी स्विकारला असून इतरही दंतचिकित्सकांची नेमणूक शाखेच्या इतर पदांवर करण्यात आली आहे. इंडियन डेंटल असो. मुंबई शाखेचे डॉ. अशोक ढोबळे यांनी डॉ. प्रमोद गुरव, डॉ. नितीन बर्वे, डॉ. विकास पाटील, डॉ. अजित कदम, डॉ .विजय देशमुख यांच्या उपस्थितीत शाखेच्या लोगोचे अनावरण केले.
यावेळी बोलताना डॉ.विजय देशमुख यांनी ॲडव्हान्स कॅन्सर सर्जरी बाबत माहिती सांगितली.
या कार्यक्रमात वाईमधील पहिले-वहीले दंतचिकीत्सक म्हणून ओळखले जाणारे डॉ. त्रिंबक व डॉ. कुसुमताई गोखले व डॉ. यशवंत रघुनाथ केळकर उर्फ बाबा केळकर यांच्या परिवारांचाही गौरव करण्यात आला. त्यांचे आजपर्यंतचे दंतचिकीत्सचे योगदान अमूल्य आहे असे मत डॉ. ढोबळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये वापरण्यात आलेली फुले, हार व पुष्पगुच्छ ही वाई अक्षर इन्स्टिट्युट या विशेष असक्षम, मुलांनी बनविलेली होती यातून या शाखेचे सामाजिक भान व बांधिलकी दिसून येते.
कार्यक्रमासाठी वाई पांचगणी येथील व आसपासच्या परिसरातील सर्व IMA NIMA होमिओपॅथिक असो. चे डॉक्टर्स, व्यापारी, वकील, शिक्षकवर्ग, व्यापारी, सर्व क्षेत्रातील मान्यवरीनी हजेरी लावली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. मधुसूदन मुजुमदार, डॉ. अमित जमदाडे, डॉ. पराग लंबाडे, डॉ.विलास खरात, डॉ. अर्चना केळकर, डॉ. गिताजंली लंबाडे व इतर सर्व दंतचिकीत्सकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शितल चोपडे व डॉ. संज्योत शेंडगे यांनी केले.आभार डॉ. अमर कित्तूरकर यांनी मानले.

