पुण्यातील युवतीला लग्नाचे आमिष द्यावीत लैंगिक शोषण; युवकास पाचगणी पोलिसांनी सांगली येथू घेतले ताब्यात.. 

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथील २८ वर्षीय पीडित युवतीचे लैंगिक शोषण करून परागंदा झालेल्या २८ वर्षीय युवकास पाचगणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सांगली येथून ताब्यात घेतले.

याबाबत फिर्यादी यांनी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे दिलेली तक्रार ००/२०२५ ने वर्ग होवुन पाचगणी पोलीस ठाणेस दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा दि.२४.०९.२०२५ रोजी गुन्हा रजि. नं. २२५/२०२५ भा.न्या.सं. कलम ६५ (२) (एम), ६९, ३१८(२) अन्वये दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील रहिवाशी असणाऱ्या २८ वर्षीय पीडित युवतीस आरोपी जयंत अतुल दाभोळे वय २८ रा. सिटी स.नं.७३/९/१ शालिनी विश्व, प्लॅट नं.बी/३/३०२, दत्तनगर रोड, तिरंगा चौक, कात्रज पुणे मुळगाव विटा ता. खाणापुर जि.सांगली याने तिचा विश्वास संपादन करून घेतला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.  तिच्याशी जवळीक साधली.

दुचाकीवरून तिला पाचगणी येथे आणले तिच्याशी पाचगणी येथील एका बंगल्यामध्ये दि. २४.११.२०२३ रोजीचे रात्री ११.३० वा.चे सुमारास तिच्या इच्छेविरूध्द व संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध केले आहेत.

त्यानंतर पुणे येथे फिर्यादी राहत्या ठिकाणी तसेच आरोपी जयंत अतुल दाभोळे यांच्या सांगली विटा या ठिकाणी वेळोवेळी तिच्या इच्छेविरूध्द व संमतीशिवाय शरीरसंबंध केले. दरम्यान पिडीत फिर्यादी गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिस हॉस्पिटलमध्ये नेहुन अॅबॉर्शन केले आहे. यावर फिर्यादी यांनी वेळोवेळी लग्नाबाबत विचारणा करता तिस लग्नाबाबत नकार देवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास श्री. तुषार दोशी सोो. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कड़कर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. सुनिल साळुंखे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दिलीप पवार सोो, सहा. पोलीस निरीक्षक पाचगणी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!