महाबळेश्वर तालुक्यात एकाच दिवशी १७ शिबिरातून ४७६ दाखल्यांचे वाटप..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात महसुल सेवा पंधरवडा नविन्यपुर्ण उपक्रंमातर्गत मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशनुसार व मा.उपविभागीय अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विमुक्त जाती व भटक्या जमाती लाभार्थींना एकूण १७ शिबीरे आयोजित करून ४७६ लाभार्थी दाखल्याचे वाटप केले

महाबळेश्वर तालुक्यात सदर सर्वंगाची एकुण २३८९ लोकसंख्या असून २५ गावांमध्ये असलेल्या लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये शिधापत्रिका- ३३, जात प्रमाणपत्र-१४, उत्पन्न दाखला-११२, नॉन क्रिमीलेअर-११, रहिवास प्रमाणपत्र-१७९, अधिवास दाखला-२, विवाह नोंदणी प्रमाणपत्र- ४, जन्म मृत्यु प्रमाणपत्र- ७१, आयुष्यमान भारत कार्ड- ५० इ लाभांचा समावेश आहे.
कुंभरोशी शिबीरस्थळी तहसीलदार श्री.सचिन मस्के, यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र ईत्यादींचे वाटप केले, तसेच गुरेघर येथे नायब तहसीलदार .दिपक सोनावले, निवासी महसूल तहसीलदार विनोद सावंत, तहसिलदार यांनी मोळेश्वर येथे उपस्थित राहुन लाभार्थी यांना दाखले वितरण केले.
शिबीरासाठी.रुपेश शिंदे, मंडळ अधिकरी महाबळेश्वर, तापोळा, मंडळ अधिकारी पाचगणी, तसेच सर्व २५ गावांचे ग्राम महसूल अधिकारी यांनी उत्तम प्रकारे शिबीरांचे आयोजन करुन शिबीरांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना विविध प्रकारचे लाभ वितरणकामी परिश्रम घेतले

