आखाडे, येथील महाराजस्व अभियानात ३७२ विविध प्रकारच्या दाखल्याचे लाभार्थ्यांना वाटप..!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील करहर मंडल निहाय मौजे आखाडे येथे महाराजस्व सेवा पंधरवडा शिबिर मा. उपविभागीय अधिकारी सातारा बारकुल, मा. उपविभागीय अधिकारी व्यवहारे, मा. तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडले.या शिबिरामध्ये ३७२ प्रकारचे विविध दाखल्याचे नागरिकांना वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने शिबिराचे आयोजन करणेत आले. यामध्ये नागरिकांना विविध सेवा सुविधा अंतर्गत फार्मर आयडी, ई पीक पाहणी, शिधा पत्रिका व्यवस्थापन प्रणाली इत्यादी ची माहिती देणेत आली. मंडळ करहर मधील प्रलंबित ८ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना दाखले वाटप. तसेच विविध दाखल्यांचे वितरण करणेत आले. रहिवासी दाखले १२४, उत्पन्नाचे दाखले१०४, जातीचे दाखले ९०, आग्रिस्टॅक ९, शिधापत्रिकेवर नाव वाढवणे कमी करणे १०, अ.पा. क. कमी करणे अर्ज ०३, ए.कु.मॅ. कमी करणे अर्ज ०४, प्रकल्पग्रस्त दाखला ०१, डोंगरी ०१, डोमासाईल ०३, उत्पन्न १५, फेरफार नोंदी निर्गती १५, असे विविध प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना वाटप केले.
यावेळी मा. श्री. प्रशांत कदम रावसाहेब, मंडळ अधिकारी करहर श्री. प्रभाकर कुलकर्णी, पुरवठा अधिकारी श्री. दिपांकर पाटील, तसेच करहर मंडळ मधील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक व इतर सेवक वृंद उपस्थित होते.

