स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी तोहीद शेख मैदानात – प्रभाग क्रमांक १४ चिंचवड स्टेशन–मोहननगर–रामनगर–काळभोरनगर–दत्तवाडी मधून ‘पुस्तक’ चिन्हावर मतदानाचे आवाहन..!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पिंपरी |:- चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ — चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर व दत्तवाडी परिसरात राजकीय वातावरण तापले असून, माजी नगरसेवक स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र तोहीद शेख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नागरिकांनी ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हाचे बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन तोहीद शेख यांनी केले आहे.

स्व. जावेद शेख हे प्रभाग क्रमांक १४ मधील लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यकाळात रस्ते विकास, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच सामाजिक सलोखा जपण्यावर भर देण्यात आला. सर्वधर्मीय, सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रभागाचा समतोल विकास साधला. त्यांच्या निधनानंतर प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण जपली असून, त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी तोहीद शेख पुढे आले आहेत.
तोहीद शेख हे तरुण, सुशिक्षित व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी चिंचवड स्टेशन परिसर, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर व दत्तवाडी येथे घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. “वडिलांनी प्रभागासाठी जे काम केले, जे स्वप्न पाहिले आणि जे प्रकल्प अपूर्ण राहिले, ते पूर्ण करणे हीच माझी जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची नियमितता, स्वच्छता व्यवस्था, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, महिलांसाठी सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि मूलभूत नागरी प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा विकास आराखडा त्यांनी मांडला आहे. विकासासोबतच पारदर्शक व जनतेशी संवाद ठेवणारे लोकप्रतिनिधित्व देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिकांनी स्व. जावेद शेख यांच्या कार्याची आठवण काढत तोहीद शेख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. “हा विश्वास जपण्यासाठी आणि प्रभागाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे तोहीद शेख यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १४ — चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर व दत्तवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी ‘पुस्तक’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून तोहीद शेख यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्व. जावेद शेख यांच्या विकासाचा वारसा जपणारे आणि पुढे नेणारे नेतृत्व म्हणून तोहीद शेख यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.

