स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूलमध्ये “इतिहासा” कार्यक्रमाची रंगतदार मेजवानी; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा बहारदार आविष्कार

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : स्कॉलर्स फाउंडेशन हायस्कूल, पाचगणी येथे “इतिहासा (Itihasa)” या नावाने भव्य, असा हा बहुआयामी कार्यक्रम यामध्ये कला, हस्तकला, विज्ञान, संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, ज्ञान आणि कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार साकारला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पाचगणी : स्कॉलर फाउंडेशन मध्ये विद्यार्थी पुस्तक प्रकाशन प्रसंगी सपोनी दिलीप पवार सुनील कांबळे सिलेन वायापल्ली, सनी वरूनी..आदी

या कार्यक्रमाचे उद्घाटन स्कॉलर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती सेलिन किशोर वायपुल्ली तसेच उपाध्यक्ष श्री सनी पॉलोज वरुनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः हस्तलिखित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन हे सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पत्रकार व माजी रोटरी (अध्यक्ष) सुनील कांबळे, पत्रकार दिलीप पाडळे, विकास जंगम, शहाजी जंगम, यांच्या हस्ते पार पडले.

 

यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेली तीन पुस्तके प्रकाशित केली.पहिले पुस्तक इ. सहावीतील पूर्वित संपत याचे तर दुसरे पुस्तक, प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचा संयुक्त प्रयत्न, यात तेजल वाडकर (इ. पहिली), स्वरा चव्हाण (इ. चौथी), सफा पटवेकर (इ. चौथी) आणि शिफत बारस्कर (इ. तिसरी) यांच्या सहभागातून निर्मित, तिसरे पुस्तक इ. आठवीतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल, ज्यात रेहान शेख, अंशिका प्रजापती, साद सार्थक, संस्कार भोसले आणि दुर्वा जाधव यांचा समावेश होता.

 

पुस्तक प्रकाशनानंतर विद्यार्थ्यांनी हडप्पा संस्कृती, मुघल साम्राज्य आणि मौर्यकाल यांसारख्या ऐतिहासिक कालखंडांचे जिवंत सादरीकरण केले. त्यांच्या देखण्या मॉडेल्स आणि अभिनयामुळे इतिहास जणू प्रत्यक्ष अनुभवता आला.

कला व हस्तकला प्रदर्शनात टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून तयार केलेल्या कलाकृती, लिपन आर्ट, ओरिगामी, पेपर क्राफ्ट, रेजिन आर्ट, ज्यूट काम यांचा समावेश होता. पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि नावीन्य यांचे सुंदर दर्शन येथे घडले.

 

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासावर आधारित विविध प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टी स्पष्ट केली.

एकूणच, “इतिहासा” हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला. शिक्षण, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा समतोल साधणारा हा उपक्रम शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयाचे प्रभावी उदाहरण ठरला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!