जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात संतोष शिराळे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : जावळी तालुक्यातील ३६ म्हसवे जिल्हा परिषद गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गटातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दोनवेळा या गटाचे प्रतिनिधित्व केले असून, यावेळेसही ते लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतच मोठा विरोध होत असून, याठिकाणी मूळ ओबीसीला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वहागावच्या सरपंच संगीता शिराळे यांचे पती संतोष शिराळे यांना येथून उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत आहे.

संतोष शिराळे हे ज्येष्ठ पत्रकार असून या गटातील समस्या व प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. तसेच धरणग्रस्तांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी यापूर्वी चांगले काम केल्याने महू धरण परिसरातील गावांतील मतदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेषत: युवावर्गाचा शिराळे यांना भाजपकडून उमेदवार उभा करण्यासाठी आग्रह केला जात आहे. वहागाव गाव आजपर्यंत कायमच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याने व गेल्या कित्येक वर्षांपासून या पंचक्रोशीतील भागाला जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रतिनिधित्व दिले गेले नसल्याने संतोष शिराळे यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!