महाबळेश्वर तालुक्यात भाजपला उभारी देण्याचे काम अनिल नाना भिलारे यांनी केले : मंत्री जयकुमार गोरे..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात भाजपसाठी पोषक परिस्थिती नसताना कुशल संघटन आणि न डगमगता, अविरतपणे कसलीही तक्रार न करता पक्षाला उभारी देण्याचे काम महाबळेश्वर तालुका पूर्व मंडल अध्यक्ष अनिल नाना भिलारे यांनी केले. त्यांच्या अधिपत्याखाली भाजपची दमदार घोडदौड महाबळेश्वर तालुक्यात सुरू असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे गौरवोद्गार ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.

भिलार (तालुका महाबळेश्वर ) येथे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमप्रसंगी ना. जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, माजी आमदार मदनदादा भोसले, सुरभीताई भोसले, वाई पश्चिम अध्यक्ष दीपक ननावरे, वाई पूर्व अध्यक्ष गणेश सुतार , महाबळेश्वर पश्चिम अध्यक्ष बबन उतेकर, युवा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी , अमोल चोरमले , सागर शिवदास आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. जयकुमार गोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तर ना. गोरे यांचे हस्ते अनिल नाना भिलारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार मदनदादा भोसले म्हणाले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप तालुका अध्यक्ष अनिल नाना भिलारे यांनी तालुक्यात चांगली परिस्थिती निर्माण केली आहे. या निवडणुकीत भाजपची ताकद दाखवून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन केले.
यावेळी मेहुल पुरोहित, किसन मोर्चा अध्यक्ष संतोष कवी, मंगेश उपाध्याय, अनिल बोधे, संजय कारंजकर,राजेंद्र आबा भिलारे, जगन्नाथ भिलारे, मोहन गोळे, महादेव भिलारे, माधव बाचल, प्रदीप बेलोशे, श्रीकांत कांबळे, सुरेश साळुंखे, हिमांशु पुरोहित, रांजणे ,सौ. आवाडे, आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.
संतोष कवी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर आभार अनिल नाना भिलारे यांनी मानले..

