माजी नगरसेविका निलम जवळ यांनी निवडणूक लढावी याकरिता सर्वसामान्य नागरिकांची आर्तहाक; मेढा नगराध्यक्ष पदाकरिता त्यांच्या नावाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साद.

Spread the love

  मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण (सर्वसाधारण महिला) जाहीर होताच पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी एका चेहऱ्याला प्रथम पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे.  तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते साद घालत आहेत. हा चेहरा कोण असे अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र ज्या चेहऱ्याने मागील पंचवार्षिक मध्ये नगरसेविका म्हणून लोकाभिमुख कामे केल्यानेच माजी नगरसेविका निलम जवळ हे नाव सर्वत्र चर्चिले जात आहे. तर सौ जवळ यांच्याशी संपर्क साधला असता. ही लोकभावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं..

जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नीलम जवळ या शिवसेनेच्या माध्यमातून युवा तरुणी नगरसेविका निवडून आल्या होत्या. तर विरोधीपक्षातून त्यांना सभापती पद मिळाले होते. शिक्षण आणि आरोग्य या खात्यातून  मिळालेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकांभिमुख कामे केली आहेत. त्या माध्यमातून आजही त्या मतदारांच्या स्मरणात राहिल्या आहेत.

समाजसेवेचा वसा घेतलेल्या निलम हिने अनेक समाजहिताची कामे करण्याला प्राधान्य दिले. त्याचीच पोहच म्हणून आज मेढा नगरपंचायत हद्दीतील शहर परिसरातील सर्वसामान्य मतदाता नागरिक माजी नगरसेविका निलम जवळ यांना नगराध्यक्ष म्हणून पाहण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हक्काच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये उभे राहण्याकरिता नागरिक गळ घालत आहेत.
तर अनेकांनी त्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरावे म्हणून मोबाईल कॉल करून संपर्क साधत आहेत. मात्र निलम जवळ यांनी अद्यापि कोणताही निर्णय जाहीर केला नसला तरी लोकभावना निलम जवळ यांना पुन्हा निवडणूक आखाड्यात येणास भाग पडणार हे पहावे लागले..

निलम जवळ मुळात शिवसैनिक आहेत. यांना शिवसेनापक्ष सुद्धा नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरू पाहत आहे. याकरिता पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासाठी आग्रही आहेत मात्र निलम जवळ यांचा निर्णय गुलदस्त्यात आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!