शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीरंग गलगले यांची नियुक्ती..! जिल्ह्यात शिवसेनेला बळ..

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी रामवाडीचे सुपुत्र श्री. श्रीरंग रामचंद्र गलगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र नुकतेच सातारा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरंग गलगले या सुफूर्त करण्यात आले.

यावेळी पर्यटन व पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई, प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विशंबर बाबर, नवी मुंबई संपर्क अंकुश बाबा कदम, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख, एकनाथ ओंबळे, जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, तालुका प्रमुख समीर गोळे, दत्तात्रय पोफळे, आदी उपस्थित

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथरावजी शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्रीरंग गलगले यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याप्रमाणे जिल्ह्यात शिवसेनेचे विचार पोचविणार आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे श्री गलगले यांनी सांगितले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!