पाचगणी पोलीस स्टेशन दुहेरी पुरस्काराने सन्मानित..! सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार, तर न्यायालयीन उकल कामी “प्रशंसापत्र” ..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हे प्रकटीकरण कामकाजात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाचगणी पोलीस स्टेशनचा सर्वोत्कृष्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार तर दुसऱ्या गुन्ह्यात न्यायदान प्रक्रियेत उकल करण्यास केलेली मदत याबद्दल “प्रशंसापत्र” अशा दुहेरी पुरस्कार जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

बुधवारी सातारा पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पदभार घेतल्यापासून पाचगणी पोलीस स्टेशनचा कारभार उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. गुन्ह्यांचे अत्यल्प प्रमाण असताना देखील सपोनि पवार यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर अधिक भर दिला आहे.

त्यांच्या सायबर गुन्हे प्रकटीकरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस स्टेशनला सर्वोत्कृस्ट सायबर प्रकटीकरण पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सपोनि दिलीप पवार तसेच त्यांच्यासमवेत पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे अमोल जगताप, महिला पोलीस अंमलदार रेखा तांबे यांनी स्वीकारला.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या एका दारूबंदी गुन्ह्यामध्ये
पांचगणी पोलीस ठाणेकडील महा. दारुबंदी दाखल गुन्ह्यातील पंच, साक्षीदार, अहवाल मा. न्यायालयात वेळेत हजर केले. समन्स बजावणी करुन साक्षीदार यांना साक्ष देणेबाबत मार्गदर्शन केले. एकंदरीत आपले नैसर्गिक व अभिजात गुण कौशल्याचा वापर करुन गुन्हयातील महत्वाचे साक्षीदार यांना योग्य अचूक मार्गदर्शन केले, तसेच त्यांना न्यायालयात निर्भयपणे साक्ष देणेस मदत केली. त्याचबरोबर गुन्ह्यात नेमलेल्या सरकारी वकीलांशी योग्य तो समन्वय व त्यांना योग्य ती माहिती पुरविल्यामुळे गुन्हा शाबीत होण्यास मदत झालेली आहे.
आपण केलेल्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत आपले “हार्दिक अभिनंदन” करण्यात येत आहे, तसेच यापुढील काळातही आपण कर्तव्यतत्पर राहून जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता व परिणामकारकता वाढविण्यास प्रयत्नशील राहाल असा आमहास दृढ विश्वास आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी “प्रशंसापत्र” देऊन गौरविले आहे..

