“भिलार गणात ‘लाडक्या बहिणी’चा जलवा – महिला मतदारांचा सुप्रिया भिलारे यांना उत्स्फूर्त पाठिंबा”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील प्रत्येक गावात भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश झाल्याने अवघ्या काही तासांतच प्रचाराला अधिकच वेग आला असून संपूर्ण परिसर निवडणूकमय झाला आहे.

‘लाडक्या बहिणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला मतदारांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून, विविध गावांतील प्रचार दौऱ्यांदरम्यान महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळत आहे. प्रचार सभांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, संवाद आणि प्रतिसाद यामुळे सौ. सुप्रिया भिलारे यांच्या प्रचाराला वेगळीच ऊर्जा मिळत आहे.
सौ. सुप्रिया भिलारे यांच्या विकासाभिमुख भूमिकेवर तसेच महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत महिला मतदारांमध्ये वाढता विश्वास निर्माण झाला असल्याचे दिसून येते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, सामाजिक सुरक्षिततेसाठी व दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका मतदारांना भावत आहे.
महिला मतदारांचा हा वाढता विश्वास आणि सक्रिय सहभाग सौ. सुप्रिया भिलारे यांच्या प्रचाराचा प्रमुख आधार ठरत असून, त्यामुळे त्या विजयाच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही हा सकारात्मक प्रतिसाद कायम असून, येत्या निवडणूक निकालावर त्याचा निर्णायक प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

