म्हसवे गणातून रेश्मा पोफळेंचा भाजपकडून अर्ज दाखल; शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी पंचायत समितीच्या म्हसवे गणातून आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाच्या वतीने सौ. रेश्मा समाधान पोफळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वालुथचे सरपंच व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांच्या पत्नी असलेल्या रेश्मा पोफळे या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

यावेळी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जावळी तालुक्यातील हेवीवेट नेते व माजी उपाध्यक्ष तथा म्हसवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार वसंतराव मानकुमारे, प्रतापगड साखर कारखान्याच्या संचालिका सुनेत्रा शिंदे, सौरभ बाबा शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. नामनिर्देशन मिरवणुकीला भाजप कार्यकर्ते, पोफळे कुटुंबीय तसेच वालुथ व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपकडून या गणात ही उमेदवारी मजबूत मानली जात असून, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रेश्मा पोफळे यांनी विकास, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

